

सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री, बिहार
esakal
सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री, बिहार
भाजपने बिहार विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, भाजपचा राज्यातील चेहरा म्हणून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नावाची चर्चा होत आहे. विरोधी पक्षांनीही भाजपवर टीका करताना, सम्राट चौधरी यांनाच लक्ष्य केले आहे. या सर्व मुद्द्यांवर साप्ताहिक सरकारनामाचे प्रतिनिधी उज्ज्वलकुमार यांनी सम्राट चौधरी यांच्याशी संवाद साधला.
बिहारने श्रीकृष्ण सिन्हा यांच्यापासून ४० वर्षांमध्ये अनेक मुख्यमंत्री पाहिले. त्यातील कोणीही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. २०००मध्ये नितीशकुमारांच्या पक्षाचे ३४ आमदार होते, तर भाजपचे ७० आमदार होते. तेव्हापासून बिहारच्या हितासाठी भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार यांनाच पाठिंबा दिला आहे. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये विकास करून दाखविला आहे. त्यांनी बिहारला शिक्षणामध्येही आघाडीवर नेले आहे. बिहारमध्ये २००० माध्यमिक शाळा होत्या, त्या आता १० हजारांच्या पुढे गेल्या आहेत. २०२०मध्ये नितीशकुमारांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, मात्र त्यांनीच सरकारचे नेतृत्व करावे, अशी गळ पंतप्रधान मोदी यांनी घातली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
— सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री, बिहार