
भारताच्या सहस्ररंगी सिनेमाचा शोध घ्यायचा तर या भूमीतली विलक्षण माणसं शोधली पाहिजेत. अनेक विचारप्रवाहांचा लोट येत असताना सामान्य माणूस त्याला कसा सामोरं जातो हे बिमलदांच्या ‘उदयेर पाथे’ने सांगितलं. प्रणयाचे, संगीताचे इंद्रधनू न्याहाळताना माणसांची नाती तर तुटत नाहीत ना, हे सांगणारा ‘अंदाज’ घेऊन महबूब खान आले. आपल्या मातीची चाकरीच मानाची भाकरी देईल, असा संदेश भालजी पेंढारकर ‘मीठ भाकर’मधून घेऊन आले आणि राखेतून भरारी घ्यायची असते, हे सांगणारा काळ अधोरेखित करणारी सोन्यासारखी माणसं असतात...