

Biocodicology
esakal
डॉ. दीप्ती सिधये
‘बायोकोडिकोलॉजी’ ही विज्ञानशाखा आपल्याला आठवण करून देते की, प्रत्येक पुस्तक हा केवळ माहितीचा साठा नसून एक जिवंत परिसंस्था आहे आणि या ‘पुस्तकातला किडा’ ज्ञानपिपासू असण्याऐवजी स्वत:च ज्ञानाचा स्रोत आहे.
सर्वसामान्यपणे ‘पुस्तकातला किडा’ (Bookworm) हे शब्द ऐकल्यावर आपल्याला आठवण होते वाचनवेड्यांची. पुस्तक वाचण्याची खूप आवड असलेली ही व्यक्ती दिवस-रात्र, वेळ मिळेल तेव्हा फक्त वाचन करत असते, ज्ञान मिळवित असते. लेखाचे शीर्षक वाचून हा लेख अशा वाचनवेड्यांविषयी आहे, असे तुम्हांला कदाचित वाटले असेल.