
What is Biohacking? : फिटनेस क्षेत्रात अनेक नवनवे ट्रेंड येत असतात त्यातलाच नवा ट्रेंड आहे, बायोहॅकिंग. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझपासून अनेक नवश्रीमंत या बायोहॅकिंगचा वापर करून आरोग्य कमावत आहेत. बायोहॅकिंग म्हणजे नेमकं काय, चांगल्या आरोग्याशी त्याचा कशाप्रकारे संबंध आहे, सगळं काही जाणून घेऊया...
बायोहॅकिंग म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि जीवनशैलीतील बदलांच्या साहाय्याने शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्याची, सुधारण्याची प्रक्रिया. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी बायोहॅकिंगचा आधार घेतला जातो. काहीवेळा या प्रक्रियेत काही जनुकीय फेरफारही केले जातात म्हणूनच याला बायोहॅकिंग असं नाव दिलेलं आहे. काही लोक बायोहॅकिंगसाठी नैसर्गिक उपायांचा वापर करतात, तर काही लोक शरीरात चिप किंवा उपकरणे बसवून त्याचा प्रयोग करतात.