Premium|Biological Age vs Chronological Age : जन्मतारखेचे वय आणि शरीराचे वय वेगळे कसे? जाणून घ्या विज्ञान

Biological Age and Healthy Ageing : जन्मतारखेवरून ठरणारे वय आणि शरीराचे जैविक वय वेगवेगळे असू शकते. आहार, व्यायाम, झोप, ताण आणि सवयींचा आरोग्यपूर्ण वृद्धत्वावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या.
Biological Age vs Chronological Age

Biological Age vs Chronological Age

esakal

Updated on: 

डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com

आपला उद्देश केवळ आयुष्यात वर्षे वाढवणे नसून, त्या वर्षांत आरोग्य, स्वावलंबन आणि आनंद वाढवणे हा असायला हवा. तेव्हा पुढील वाढदिवशी केकवरील मेणबत्त्या मोजताना घाबरू नका. त्या फक्त पृथ्वीने सूर्याभोवती मारलेल्या फेऱ्या सांगतात. तुमचे शरीर त्या प्रवासात किती तंदुरुस्त राहिले, ही कथा तुमचा आहार, व्यायाम, झोप, ताण, सवयी आणि सामाजिक नाती मिळून लिहीत असतात.

आपल्याकडील पौराणिक कथांमध्ये वर्णिलेल्या जीवामृताचा शोध लागून मनुष्य अजरामर होईल किंवा मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, ही श्रद्घा बाळगणारे अनोखे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील मानसशास्त्राचे प्राध्यापक जेम्स बेडफर्ड यांनी दूरचा केलेला विचार! कर्करोगामुळे १२ जानेवारी १९६७ रोजी मृत्यू झाल्यानंतर भविष्यात विज्ञान त्यांना पुन्हा जिवंत करू शकेल, या आशेने त्यांचे शरीर अतिशीत अवस्थेत जतन करण्यात आले आहे. दीर्घकाळ जतन केलेल्या मानवी क्रायोनिक्स प्रकरणांतील ते पहिले प्रसिद्ध उदाहरण म्हणता येईल. आज तरी त्यांना जिवंत करणे शक्य नाही; पण माणसाचे दीर्घ आयुष्य वाढविण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. या प्रयत्नांचे भाग म्हणून आपण वय म्हणजे काय हे वैज्ञानिकरीत्या समजून घेतले पाहिजे.

शाळेतील मित्रांचा पंचवीस-तीस वर्षांनंतर मेळावा भरला की एक गमतीदार दृश्य दिसते. सर्व मित्र जवळपास एकाच वयाचे असतात; पण त्यांच्याकडे पाहिल्यावर वय मात्र वेगवेगळे वाटते. एक मित्र अजूनही उत्साहाने जिने चढतो, दुसरा दोन मजले चढल्यावर दमतो. कुणाची स्मरणशक्ती तल्लख असते, तर कुणाला चष्मा कुठे ठेवला, हे चष्मा डोक्यावर असतानाही आठवत नाही! कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि सांधेदुखीने गाठलेले असते; तर त्याच वयाची दुसरी व्यक्ती नियमित व्यायाम करीत प्रसन्न आयुष्य जगत असते. जन्मतारखेनुसार वर्गातील सर्वांचे वय जवळ जवळ सारखे, मग शरीरांच्या प्रकृतीत एवढा फरक का? याचे उत्तर दडले आहे ‘जैविक वय’ अर्थात बायोलॉजिकल वय या नव्या वैज्ञानिक संकल्पनेमध्ये.

Biological Age vs Chronological Age
Premium|Study Room : मतदारयादीचा प्रश्न ते शेतकरी आंदोलन; भारतातील पाच मोठ्या आंदोलनांचा इतिहास काय सांगतो?
Loading content, please wait...