
Blood Donation
esakal
रक्त मिळतं ते फक्त दुसऱ्याच्या दानातून. म्हणूनच रक्तदानासाठी केवळ शरीर नाही; तर एक वेगळीच मानसिकता लागते. आमच्यासाठी रक्तदान शिबिर सणासुदीइतकीच महत्त्वाची गोष्ट होती. कोणत्याही कार्यप्रसंगी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करायचो. रक्तदान असो किंवा रुग्णसेवा मला त्यातून अलौकिक मानसिक शांती मिळते.
हाच माझा खरा धर्म,
हेच माझं अध्यात्म...
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे’ हे मी लहानपणीच जाणून होतो. रक्त ही अशी गोष्ट आहे, की जी कुठल्याही कारखान्यात, कुठल्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. रक्त मिळतं ते फक्त दुसऱ्याच्या दानातून. म्हणूनच रक्तदानासाठी केवळ शरीर नाही; तर एक वेगळीच मानसिकता लागते. माझ्या आयुष्यातील पहिलं रक्तदान हे एका मित्रासाठी केलं होतं. त्याचं नाव गुणवंत. तेव्हा वय अठरा वर्षं पूर्ण असणं आणि वजन किमान पन्नास किलो असणं ही प्राथमिक अट होती; पण मी दोन्ही अटींना थोडासा फाटा देऊन रक्तदान करायचं ठरवलं. त्या क्षणापासून मला जाणवलं, की हे कार्य फक्त सामाजिक नाही; तर आध्यात्मिक आहे. त्या नव्वदच्या दशकात अमरावतीत रक्तदान चळवळ फारशी रुजलेली नव्हती. महेंद्रजी भुतडा, अजय दातेराव यांच्यासारखे थोडेच लोक प्रयत्नशील होते; पण हळूहळू माझ्याभोवती जीवाभावाचे कार्यकर्ते जमा झाले. मी जाहीरपणे सांगायचो, की ‘खरा कार्यकर्ता तोच, जो स्वतः रक्तदान करतो आणि इतरांना प्रेरणा देतो.’