

BMC elections
esakal
बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कधी काळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आता बदलणाऱ्या आघाड्या आणि युती; तसेच अस्मितेचे राजकारण यांमुळे संघर्षाचे रणांगण बनली आहे.
बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप-शिवसेना असा हा सरळ सामना आहे. राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध विजयामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली असून, त्यामुळे नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. हा निकाल केवळ मुंबईच्या नागरी भविष्यास आकार देणार नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय व्यवस्थेलाही दिशा देईल. या निवडणुका ही देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेवरील नियंत्रणाची लढाई आहे. या महापालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटींपेक्षा अधिक असून २२७ प्रभागांचा त्यात समावेश समावेश आहे. एक कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार बृहन्मुंबईचे भविष्य आणि नव्या आघाड्यांचा राजकीय प्रवास ठरवतील.