
भारत पाकिस्तान संघर्षात तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतल्यानंतर तुर्कीयेकविरुद्ध बंदीचं अस्त्र उगारलं गेलं. तुर्कीने पाकला ड्रोन आणि शस्त्रास्त्रे पुरवले होते. त्यामुळे स्वदेशी जागरण मंचाने तुर्की दूतावासासमोर निदर्शने केली. विविध शहरातील व्यापारी संघटनांनी तुर्कियेहून आयात होणारे सफरचंद तसेच अन्य सामानांवर बंदी घातली आहे. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) तुर्कियेसोबत तसेच अझरबैजान देशांसोबत व्यापार न करण्याचा निर्णय घेतला. जेएनयू विद्यापीठानेसुद्धा तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला आहे.
यातीलच महत्त्वाची घडामोड म्हणजे, केंद्र सरकारने अलीकडेच तुर्कियेची ग्राउंड हॅंडलिंग कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसचा सुरक्षा परवाना रद्द केला.