

Brain Focus
esakal
रिता गुप्ता- info@reeta
ramamurthygupta.in
पल्या मेंदूची क्षमता ही आपल्या बँक बॅलन्ससारखीच असते. पगार हातात पडल्यावर आपण जर तो विनाकारण, निरुपयोगी गोष्टींवर खर्च केला, तर फार लवकर संपतो. मग गरजेच्या किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसा उरतच नाही. आता हेच तत्त्व तुमच्या ‘लक्ष केंद्रित करणं’ किंवा एकाग्रता (Attention) यावर लागू करून बघा. एकाग्रता ही मेंदूची अतिशय मौल्यवान आणि मर्यादित संपत्ती आहे; पण ती आपण अतिशय निरर्थक गोष्टींवर वाया घालवतो. त्यामुळे जे खरंच महत्त्वाचं आहे, त्यासाठी लक्षच उरत नाही.