Premium| AI safety law Brazil: एआयच्या धोक्यांविरोधात जागतिक सावधगिरी

Protect children online AI: ब्राझीलमध्ये मुलांना ऑनलाइन सुरक्षित ठेवणारा कायदा लागू झाला आहे. या कायद्यामुळे बिग टेक कंपन्यांना मुलांच्या माहितीचा वापर मर्यादित राहणार आहे
AI safety law Brazil

AI safety law Brazil

esakal

Updated on

ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी सप्टेंबरच्या मध्यात, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी, मुलांना ऑनलाइन सुरक्षित ठेवणारा देशाचा पहिलाच कायदा सही करून लागू केला. ‘एआय’ आणि सोशल मीडिया कंपन्यांनी याला प्रखर विरोध केला होता. पण अध्यक्षांनी लोकांचा पाठिंबा मिळवून बिग टेक कंपन्यांना आवर घातला. आता ब्राझीलमधील मुलांची वैयक्तिक माहिती, जसे की छायाचित्रे ‘एआय’ साधने तयार करण्यासाठी वापरता येणार नाहीत. कंपन्यांना मुलांच्या ऑनलाइन वर्तनावर नजर ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा कायदा प्रथम २०२२मध्ये सिनेटर फ्लाविओ आर्न्स आणि अलेस्सांद्रो व्हिएरा यांनी सादर केला होता. नोव्हेंबर २०२४मध्ये तो सिनेटमध्ये सर्वानुमते मंजूर झाला आणि ऑगस्ट २०२५मध्ये ब्राझीलच्या लोकसभेत जवळपास सर्व पक्षांच्या समर्थनासह त्याला मान्यता दिली. केवळ एक आठवड्यानंतर सिनेटने पुन्हा एकदा तो पारित केला. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, ब्राझीलचे नेते २०२२मध्येच चॅटजीपीटीच्या सुरुवातीच्या दिवसांत, ‘एआय’ सुरक्षिततेला गांभीर्याने घेऊ लागले होते. त्यांची चिंता फक्त आर्थिक फायद्यापुरती मर्यादित नव्हती. तेवढीच गंभीर चिंता त्यांनी एआय सुरक्षिततेबाबतही व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com