

Budget Smartphones: महागाईच्या काळात काही बाबींची किंमत मात्र कमी झालेली आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे स्मार्टफोन. आता अगदी लाखापर्यंत फोन्स बाजारात असतील पण कमी किंमतीतसुद्धा तुम्हाला चांगली फीचर्स असलेले स्मार्टफोन घेता येतात. त्यामुळेच स्वस्त स्मार्टफोनची एक लाट आलेली आहे. २०हजारापेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीत तुफान वाढ झालीय. २०२३पेक्षा २०२४मध्ये ती जास्त होती आणि २०२५मध्ये ती आणखी होईल, असा अंदाज आहे.