
निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखकर आणि पैशांची चिंता नसलेलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. एखाद्याला रिटायरमेंट पर्यन्त साधारण किती साठवता येतील बरं?
आपण दरमहा किती साठवतोय यावर आपली अंतिम पुंजी ठरते. तुम्ही तरुण असाल तर आत्ताच बचत सुरू करणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. कारण जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितकं चांगलं!
सध्या ₹१० कोटींचा रिटायरमेंट फंड जमवणं खूप अवघड वाटू शकतं, पण योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीने हे सहज शक्य आहे. ते कसं बरं? एवढे पैसे जमवायला अख्खा पगार लागेल का? १० कोटी रुपये जमवायचे असतील आत्ताच लाखात गुंतवावे लागतील का? मी तरुण आहे, आता मजा करतो, नंतर गुंतवणुकीचं बघितलं तरी चालेल नाही का? तर नाही. हे सगळं इतकं सोपं नाहीये. पण तुम्हाला वाटतंय तेवढं अवघडही नाहीये! आणि हो, ‘सकाळ प्लस’च्या या लेखात तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही आहेत...