
CAPTCHA Digital security: CAPTCHA चा वापर सुरु होऊन आता २५ वर्ष होत आली. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला त्याचा वापर सुरू झाला. कारण तेव्हा इंटरनेटवर बॉट्सचा सुळसुळाट झाला होता. हे बॉट्स बनावट खाती तयार करत असत. ऑनलाइन व्यवहार करताना हटकून कॅपचाचा पर्याय येतो आणि तो सोडवावाच लागतो. कारण ऑनलाईन येणारी व्यक्ती आहे की एखादा बॉट हे कळण्यासाठी कॅपचा गरजेचा असतो. वेबसाइटवरील माहिती चोरून गोंधळ घालणाऱ्या बॉटच्या रुपातील इंटरनेट चाच्यांना काबूत आणण्यासाठी कॅपचा आला. आपल्या ऑनलाइन सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या या कॅपच्याचा शोध कुणी लावला, त्याच्यामुळे बॉट्स कसे ओळखता येतात, कॅपचा का गरजेचा असतो? आणि संगणकाला कॅपचा सोडवणं का कठीण जातं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, सकाळ प्लसच्या या लेखातून.