
पाऊस... नावाप्रमाणेच हा अनुभव खूप काही देतो. चहा-भजीचा आस्वाद, खिडकीतून दिसणारा हिरवागार निसर्ग आणि थंड हवा. पण या सगळ्यासोबतच एक मोठा प्रश्नही सतावतो - "गाडी पाण्यामुळे बंद पडली तर?"
नुकत्याच झालेल्या तुफान पावसाने सगळीकडेच हाहाकार उडवला. शिवाय एका दिवसात १७० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने मुंबई तर अक्षरशः पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पाणी साचलं, ट्रेन आणि फ्लाइट्सचं वेळापत्रक बिघडलं. अशावेळी गाडी चालवणारे आणि मालक सगळेच टेन्शनमध्ये आले. माझी गाडी सेफ असेल का? पाणी घुसून नुकसान झालं तर इन्शुरन्स कव्हर देईल का? या प्रश्नाचं उत्तर आहे- तुमच्याकडे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीवर हे सगळं अवलंबून आहे! म्हणजे काय ते समजून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखातून...