
Caste Census: राहुल गांधींच्या बोलण्यातून सतत येणारा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आता पंतप्रधान मोदींनीही उचलून धरला आहे. बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना मोदींनी देशव्यापी जातनिहाय जनगणना होणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची चर्चा झाली आणि केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं की, जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे.
पण जातनिहाय जनगणना म्हणजे नेमकं काय? नेहमीच्या जनगणनेत आणि त्यात फरक काय? अशापद्धतीच्या वेगळ्या जनगणनेची गरज का आहे? त्यातून कोणाला फायदा होणार ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी वाचा, सकाळ प्लसचा हा खास लेख.