
Caste bias in bureaucracy
esakal
डॉ. सुमीत म्हसकर / डॉ. प्रबोधन पोळ
हरियानातील आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा नोकरशाहांमधील जातीय पूर्वग्रहाचा मुद्दा उपस्थित होतो. नोकरशाहीतील जातीय पक्षपाती पद्धतींच्या विरोधाची कुमार यांना मोठी किंमत मोजावी लागल्याचे दिसते. त्यांच्या आत्महत्येने ‘जातीरहित नोकरशाह’ अशा मिथकावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
७ ऑक्टोबर रोजी हरियाना कॅडरमधील ५२ वर्षीय दलित समुदायातील आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांनी आत्महत्या केली. जातीय पक्षपात, प्रशासकीय अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सक्रिय भूमिका घेण्यासाठी कुमार ओळखले जात असत. अहवालानुसार, त्यांनी अनियमित पदोन्नती आणि नियुक्त्यांना आव्हान दिले, पोलिस दलामध्ये अनुसूचित जातींचे प्रातिनिधित्व मागितले, आयपीएस अधिकाऱ्यांना अधिकृत वाहनांच्या पक्षपाती वाटपावर टीका केली आणि सिरसा येथील पोलिस लाइन्समध्ये अवैध मंदिराच्या बांधकामाला विरोध केला; मात्र नोकरशाहीतील जातीय पक्षपाती पद्धतींच्या विरोधाची कुमार यांना मोठी किंमत मोजावी लागल्याचे दिसते.