
Gig worker rights India
esakal
अजित अभ्यंकर
‘गिग’ कामगारांच्या सेवा-शर्ती व अन्य संरक्षणाबाबत विविध राज्ये नियमन करण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु खरे तर केंद्र सरकारनेच याबाबत पुढाकार घेऊन ॲप नियोक्ता-कर्मचारी संबंधांसाठी सक्रिय हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. जेणेकरून गिग कामगारांना हक्क म्हणून काही अधिकार मिळतील आणि त्यांच्या सेवाशर्ती नियमित केल्या जातील.
सं ध्याकाळाची वेळ. शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर असणारी प्रचंड वाहतूक. त्यात आपल्याला दिसतो मोटारसायकलचालक. त्याच्या पाठीच्या दीडपट आकाराची बॅग पाठीवर घेऊन वेळेत पोचण्यासाठी काहीही करून वाहतुकीतून पुढे जाण्याची लगबग. हाच तरुण कधीतरी आपल्या घराची बेल वाजवतो. हातात पार्सल देऊन जातो.