Understanding the economics behind turning lead into gold :
गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना अखेल यश आले आहे. स्वित्झर्लंडमधील जगातील सर्वात मोठ्या particle accelerator म्हणजेच CERN येथील Large Hadron Collider (LHC) मध्ये शास्त्रज्ञांनी शिशाचे सोन्यात रूपांतर करण्यात यश मिळवले आहे.
सोन्यामधील गुंतवणूक हा गुंतवणुकीतील एक महत्त्वाचा घटक आहे. अनेक देशांनी मंदीच्या काळात सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांच्या या संशोधनाने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ही बातमी अनेकांना थक्क करणारी आहे. या वैज्ञानिक चमत्काराचा सोन्याच्या दरावर कोणताही परिणाम होईल का, हा प्रश्न आता अनेकांना पडतो आहे.
हा विषय नेमका काय, हे सोने कसे तयार केले गेले आणि यामागची प्रमुख कारणे समजून घेण्यासाठी संशोधन आणि सोन्याच्या बाजाराचे अर्थशास्त्र दोन्ही समजून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून..