
विद्याधर अनास्कर
केंद्रामध्ये प्रथमच सहकारी मंत्रालयाची स्थापना व पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांनी पदभार स्वीकारल्यापासून देशातील सहकारी क्षेत्रासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेत सहकार मंत्रालयाची उपयुक्तता सिध्द करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय कामाला लागल्याचे दिसत आहे.
संपूर्ण सहकारी क्षेत्राच्या सक्षमीकरणाची घोषणा शहा यांनी यापूर्वीच केलेली आहे. राष्ट्रीय सहकार धोरण-२०२५ हा देखील अनेक महत्वाच्या निर्णयामधील सर्वोत्तम निर्णय ठरावा ही अपेक्षा. याकरिता राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे.