

Champions Trophy 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत ( ICC) आता मोठ्या घडामोडी घडायला सुरूवात झाल्या आहेत. जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि त्यांच्यासमोर पहिलाच निर्णय हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा आला. भारत-पाकिस्तान यांच्यातले वैर सर्वश्रुत आहे आणि त्यामुळेच दोन्ही देशांमधील द्विदेशीय क्रिकेट मालिका १२-१३ वर्षांपासून झालेल्याच नाही. भविष्यातही तशा मालिका होण्याच्या शक्यता कमी. म्हणूनच आयसीसी स्पर्धांमध्ये India vs Pakistan सामन्याला मोठी मागणी असते. फक्त प्रेक्षकांकडूनच नव्हे, तर ब्रॉडकास्टर्स, जाहीरातदार यांनाही हा सामना हवा असतो. या मागे बरंच अर्थकारण आहे.