
केदार फाळके
editor@esakal.com
आजच्या महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा उत्तर-दक्षिण पसरलेल्या आहेत. या पर्वतरांगांपासून समुद्रापर्यंतचा पसरलेला भाग म्हणजे कोकण होय. उत्तरेस मुंबई-ठाण्यापासून दक्षिणेला गोव्यापर्यंत या परिसराचा विस्तार झाला आहे. येथे खूप पाऊस पडतो आणि भरपूर खाड्या आहेत. मुंबई, वसई, चौल, दाभोळ, राजापूर, वेंगुर्ला अशी त्या काळाची नावारूपाला आलेली बंदरे होती. या बंदरांमधून इराणी, अरबी, तुर्की, आफ्रिकी आणि युरोपीय व्यापारी व्यापार करीत, किमती वस्तू आणि उमदे घोडे हे परदेशातून आणीत. मालाची ने-आण घाटवाटांद्वारे देशावर आणि कोकणात होत असे.