
पुणे : पहिली घटना...मोबाईल हातातून काढून घेतल्याने एका अल्पवयीन मुलाने घरातील काचा फोडल्या, आईला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, तर आईवर वार करण्याचा प्रयत्न केला (कालावधी : १४ ऑक्टोबर). दुसरी घटना...नववीतील एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील दुसऱ्या मुलावर हल्ला चढविला. काचेच्या तुकड्याने त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. (कालावधी : १९ नोव्हेंबर).