Premium | AI For kids : एआयची ओळख मुलांना कधी करून द्यायला हवी?

ChatGPT for students : गुगलने जेमिनी एआय हा चॅटबॉट वापरण्याची परवानगी अगदी १३ वर्षांखालील मुलांनाही असेल असं सांगितल आहे. इतक्या लहान मुलांना एआय सारखी गोष्ट सहज हाती द्यावी का?
Artificial Intellegence for kids
AI for kidsEsakal
Updated on

Artificial Intellegence for kids: परवाच एका ओळखीतल्या छोटीने मला सांगितलं, मावशी मला एक कोडं येत नाहीये, चॅटजीपीटीला विचार ना,

त्याच्या काहीच दिवस अगोदर आणखी एकीने मला विचारलं, अय्या तू तुझ्या मुलाची घिबली इमेज नाही तयार केलीस, माझ्या आईने तर झटपट चॅटजीपीटीला सांगितलं आणि त्याने करून दिली.

दोन्ही मुलींचं वय ७-८ वर्षांचं होतं. या दोघी निमशहरी भागातल्या मुली. अतिश्रीमंत वगैरे वर्गातल्या नव्हेत. त्यांनी सहज चॅटजीपीटीचा केलेला उल्लेख मला कोड्यात पाडून गेला. इतकं होतंय तोच गुगलची नवी घोषणा दिसली. तीही एआय चॅटबॉटविषयीची.

Google ने नुकतंच सांगितलं की, आता त्यांचा Gemini AI हा चॅटबॉट १३ वर्षांखालील मुलंही वापरू शकतात. गुगल फॅमिली लिंक वापरणाऱ्या पालकांच्या मुलांना ही सुविधा मिळणार आहे. गुगलने जरी एक नवीन सेवा देऊ केली असली तरी पालकांचं धाबं दणाणलं आहे. पण हे कुणा एकाचं दुखणं नाही तर जगभरात अनेक पालकांना आपलं मूल आणि एआय यांच्या संबंधाबद्दल भीती वाटतेय.

आपल्या मुलाला आर्टिफिशियअल इंटेलिजन्स अर्थात एआय चॅटबॉट्सचा वापर करायला परवानगी द्यावी का, तो वापर स्वतंत्र असावा की कोणाच्या देखरेखीखाली, मुळात मुलांना त्याची गरज आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधूया या लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com