
India cough syrup corruption
esakal
डॉ. अनंत फडके
औषधांच्या दर्जावर देखरेख ठेवण्याची यंत्रणा १९९० नंतरच्या बाजारवादी सरकारी धोरणामुळे अजून घसरली. ही नियंत्रणव्यवस्था सुधारण्यासाठी रघुनाथ माशेलकर समितीने केलेल्या शिफारशी (२००४) सरकारने फारशा अमलात आणल्या नाहीत.
‘कफ-सिरप’मधील भेसळीमुळे मध्य प्रदेश व राजस्थानमधील २२ बालके दगावल्यामुळे भारतातील काही औषधकंपन्यांच्या गुन्हेगारी बेपर्वाइचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. औषधांच्या पावडरी विरघळवून त्यांचे गोड सिरप बनवण्यासाठी संबंधित कंपनीने शुद्ध ग्लिसरिनच्याऐवजी तुलनेने स्वस्त, पण अत्यंत घातक असे ‘इंडस्ट्रिअल ग्लिसरीन’ वापरले. त्यातील ‘इथिलीन ग्लायकॉल’ किंवा ‘प्रोपिलीन ग्लायकॉल’मुळे मूत्रपिंड बंद पडून ही बालके दगावली.