

When Toys Start Thinking: The Global Ethics of AI and Children
E sakal
Emotional Infrastructure: How AI Toys Are Shaping the Next Generation
विवेक सुतार
विविध संस्कृतींमधील मुलांवर नवी खेळणी जो परिणाम करणार आहेत, त्यांचा दीर्घकालीन, सखोल अभ्यास व्हायला हवा. त्यासाठी सार्वजनिक निधी उभारावा. त्याचवेळी जगातील धोरणकर्त्यांनी एकत्र येऊन ‘एआय आणि बालपण’ यावर संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक सनद तयार केली पाहिजे.
चीनमध्ये सुमारे पंधराशेहून अधिक कंपन्या लहान मुलांशी संवाद साधणारी एआय-खेळणी मोठ्या प्रमाणावर तयार करत आहेत. ही पारंपरिक खेळणी नाहीत, जी केवळ बटण दाबल्यावर पूर्वनियोजित वाक्ये बोलतात.
उलट, सेन्सर्स, प्रोसेसर्स आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेली ही खेळणी मुलांशी खरा संवाद साधतात. हा केवळ एक नवा उद्योग नाही, तर एक धोरणात्मक बदल आहे.
सत्ता थेट माणसांची मनं घडवण्याच्या उद्योगाला लागली आहेत. ज्याला आपण ‘एआय खेळणं’ म्हणतो, ते निव्वळ उत्पादन नसून एक धोरण आहे. मुलांनी कसा विचार करावा, कुठे हसावं आणि कोणावर विश्वास ठेवावा, हे शिकवणारी ही एक नवी ‘अक्षरओळख’ आहे, जी थेट कोवळ्या मनाच्या पाटीवर गिरवली जात आहे.
चीन या खेळण्यांच्या माध्यमातून उद्याचं बालपण कसं असावं, याचे नियम मोठ्या कुशलतेने प्रचंड प्रमाणात प्रस्थापित करत आहे. हे केवळ खेळणे नाही, तर घरात आलेला एक ‘संस्कार-देव’ आहे, जो ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून मुलांच्या मूल्यांवर प्रभाव टाकतो. ही खेळणी सत्ता आणि विचारांच्या मोठ्या साखळीतून प्रवास करून आपल्या घरात पोहोचतात, आणि त्यांची निर्मिती शेनझेनसारख्या शहरांमध्ये अविश्वसनीय वेगाने होते आहे.