
China Halts Fertiliser Exports to India
भारतात आयात होणारी ८० टक्के खतं चीनकडून येतात पण गेले दोन महिने चीनने खतांची शिपमेंटच थांबवली आहे. फळं, भाजीपाला अशा शेतीमालाचं उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाची असलेली काही महत्त्वाची खतं या शिपमेंटमध्ये होती. एकीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटतायत. चित्रं भेट देतायत. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखावी म्हणून सांगतायत आणि दुसरीकडे चीनचं हे एक वेगळंच व्यापारयुद्ध सुरू केलंय. याविषयी वाचूया सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.
कितीही औद्योगिक क्रांती झाली तरी अजूनही भारत कृषीप्रधान देश आहे. शिवाय घाऊक उत्पादन घ्यायचं असेल तर खतांना पर्याय नाही. त्यामुळेच इतर आयात-निर्यातीबरोबरच ही खतांची आणि शेतमालाशी संबंधित वस्तूंची आयातनिर्यात भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असते. खतांच्या आयातीतील ८० टक्के आयात भारत चीनकडून करतो.