

AI agent hospital
esakal
चीनमध्ये नुकताच एक भन्नाट प्रयोग सुरू झालाय. त्याला ‘एआय एजंट हॉस्पिटल’ असं म्हटलं जातंय. अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आणि हॉस्पिटलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू होता. विशेषत: रेडिऑलॉजीमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिस्टिम्स इतक्या जलद आणि अचूक पद्धतीनं स्कॅन्स तपासायला लागल्या, की डॉक्टरांना रोग ओळखायला, पेशंटचं आरोग्य पुढे कसं खराब होईल हे आधीच सांगायला आणि ट्रीटमेंट प्लॅन सुचवायला त्याचा मोठा उपयोग व्हायला लागला. आयबीएम वॉटसन आणि गुगल डीप माइंड यांच्यासारख्या सिस्टिम्सनं कॅन्सर स्कॅन्स आणि लॅब डेटा समजून घेऊन डॉक्टरांना मदत करणं चालू केलं आहे. पण मानवी डॉक्टरांना पूर्णपणे रिप्लेस करणं अजून शक्य झालं नाहीये. एआयनं कितीही प्रगती केली असली, तरीही अजूनही मेडिकल फिल्ड आणि हॉस्पिटल्समध्ये सध्या तरी ह्युमन टच हा लागतोच आणि तो पुढील अनेक वर्षे तरी लागतच राहील ह्यात शंकाच नाही.