Premium|What Is Circadian Depression : सर्कॅडियन डिप्रेशन म्हणजे काय? झोपेच्या वेळेचा आणि नैराश्याचा काय संबंध आहे?

Circadian Rhythm and Depression Research: झोपण्याची आणि उठण्याची वेळ, सकाळचा थकवा आणि नैराश्याची लक्षणे यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी सिडनी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी अभ्यास केला. मात्र, ‘सर्कॅडियन डिप्रेशन’ हा स्वतंत्र आजार असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.
What Is Circadian Depression

What Is Circadian Depression

esakal

Updated on: 

सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय का? दिवसभर उदास वाटतंय का? मग यामागे फक्त नैराश्यच कारणीभूत आहे, असं नाही. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेचाही नैराश्याशी संबंध असू शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. नेमकं सर्कॅडियन डिप्रेशन म्हणजे काय? संशोधनातून काय समोर आलंय? सविस्तर वाचा, सकाळ प्लसच्या या लेखामध्ये.

नैराश्याचा संबंध फक्त मनःस्थितीशी नसतो, तर झोप, दिवसभर जाणवणारी ऊर्जा आणि झोपण्याच्या व उठण्याच्या वेळेशीही असू शकतो. सिडनी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी एका अभ्यासात नैराश्याची लक्षणं आणि झोपण्याच्या व उठण्याच्या वेळेचा काय संबंध आहे, हे तपासलं. या अभ्यासासाठी ११ हजार ३८० लोकांची माहिती तपासण्यात आली. त्यापैकी २ हजार ६०४ लोकांमध्ये झोपेच्या वेळेशी आणि नैराश्याशी संबंधित काही लक्षणं एकत्र दिसून आली.

सर्कॅडियन डिप्रेशन म्हणजे काय?

‘सर्कॅडियन’ म्हणजे आपल्या शरीराची झोपण्याची आणि उठण्याची नैसर्गिक वेळ. याचा परिणाम आपल्याला कधी झोप येते, दिवसभर किती जागरूक वाटतं आणि शरीरातील काही प्रक्रिया कशा चालतात, यावर होतो. प्रकाश, अंधार आणि आपला रोजचा दिनक्रम यांचाही झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर परिणाम होतो.

नैराश्य म्हणजे फक्त काही वेळ उदास वाटणं नाही. सतत खिन्न वाटणं, आवडत्या गोष्टी कराव्याशा न वाटणं, शरीरात ऊर्जा कमी होणं, झोप किंवा भुकेत बदल होणं आणि रोजच्या कामांवर परिणाम होणं, अशी लक्षणं नैराश्यात दिसू शकतात.

झोपेच्या वेळेत होणारे बदल, सकाळी जाणवणारा खूप थकवा आणि नैराश्याची लक्षणं यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा संशोधक अभ्यास करत आहेत. काही व्यक्तींमध्ये ही तिन्ही लक्षणं एकाच वेळी दिसू शकतात. याच शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधक ‘सर्कॅडियन डिप्रेशन’ या संकल्पनेचा विचार करत आहेत.

मात्र, सकाळी थकवा जाणवतो किंवा रात्री उशिरापर्यंत जाग येते, म्हणजे सर्कॅडियन डिप्रेशन आहे, असं समजणं चुकीचं ठरेल. या लक्षणांमागे इतरही कारणं असू शकतात.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com