

अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
गुपचूप तोबा खेळ म्हणून ठीक. सामान्य नागरिकांच्या बाबतीत होणं वाईट. आपण सगळे रिंगणात बसलोय, असं आपल्याला वाटतं. अचानक राज्य करणारा कुणीतरी येतो आणि पेट्रोलवाढीचा रुमाल टाकून जातो. आपण म्हणतो, कच्च्या तेलाच्या किमती तर वाढल्या नाहीत; तर पुन्हा आपल्याच अंगावर येणार. कधी अचानक गाडीची नंबरप्लेट बदला. बरं, त्याला कुणाची हरकत नाही; पण त्याची नीट व्यवस्था आहे का? प्रत्येक ठिकाणी लोकांनी रांग लावावी ही कुठली अपेक्षा?
नागरिकांना आता जागरूक राहावं लागेल. आश्वासन किंवा भूलथापांना बळी न पडता कायम सत्य शोधावं लागेल. जात-धर्म या गोष्टींत अडकवून कधी आपला ‘गुपचूप तोबा’ होतो, सांगता येत नाही.