
संजय सोनवणे, (उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स एग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीज)
राज्यातील सत्तेच्या राजकारणामध्ये किमान पुढील पाच वर्षांमध्ये स्थिरस्थावर झालेल्या महायुतीच्या सरकारचे शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दावोस दौरा करून महाराष्ट्राला १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा लाभ करून दिला. या गुंतवणुकीचा फायदा ठाणे पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या राज्यातील जिल्ह्यांना होणार आहे.
यंदाच्या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण विभाग हा नव्याने जोडला गेला आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित उत्तर महाराष्ट्राला विशेष करून अहिल्यानगर वगळता नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याला या दौऱ्याचे फलित काय मिळणार यासंदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा अशी अपेक्षा आहे.