Emissions Gap Report 2026
Esakal
पुणे- अनेक वैज्ञानिक आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये आता एक नवी निराशा पसरत चालली आहे, ज्याला 'Climate Doomism' म्हटले जाते. या मानसिकतेनुसार, ‘आता खूप उशीर झाला आहे, आपण पृथ्वीला वाचवू शकत नाही’ असा सूर उमटू लागला आहे. तरीही शास्त्रज्ञांना आणि पर्यावरणतज्ज्ञांना अजूनही वाटतं की, संधी अजून पूर्णपणे गमावलेली नाही, परंतु ती आता अगदी सेकंदाच्या काट्यावर येऊन ठेपली आहे. जर आज कठोर पावले उचलली, तर तापमानवाढीचा हा वेग नक्कीच मंदावला जाऊ शकतो. यासाठीचे मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
United Nations Environment Programme च्या २१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या Emissions Gap Report 2026 नुसार, सध्याची धोरणे कायम राहिल्यास या शतकात जागतिक तापमानवाढ २.८°C पर्यंत पोहोचू शकते. देशांनी सध्याची हवामानविषयक आश्वासने पूर्ण केली, तर हा अंदाज २.६°C आहे.
ही आकडेवारी केवळ पर्यावरणाशी संबंधित नाही. तापमानवाढीचा संबंध उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, दुष्काळ, शेतीचे उत्पादन, पाण्याची उपलब्धता, आरोग्य आणि विमा तसेच अन्नधान्याच्या किमतींशी आहे. त्यामुळे हवामानबदलाचा प्रश्न म्हणजे भविष्यातील पृथ्वी कशी असेल एवढाच नाही; बदलत्या हवामानात माणसाचे रोजचे आयुष्य किती सुरक्षित आणि परवडणारे राहील, हाही आहे. हा एकूणातच विषय काय, आकडेवारी काय हे सगळं समजून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून..
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा