Premium| Climate change: हवामानबदलाच्या शिवधनुष्याचे आरोग्यासमोर आव्हान

Public health: हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषण वाढले आहे. परिणामी हृदयरोग, श्वसनविकार आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे
Climate change

Climate change

esakal

Updated on

राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलासंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एका परिषदेची स्थापना जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली. राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्रात (एनसीडीसी) हवामानबदल आणि मानवी आरोग्यासंदर्भातील महत्त्वाचे धोरण अमलात आणण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. प्रत्येक राज्यात पर्यावरणीय आरोग्य कक्ष स्थापण्यात आला आहे. मनुष्यबळाची कमतरता, अपुरा आर्थिक पाठिंबा, व्यवस्थापकीय कमतरतेमुळे त्रस्त सार्वजनिक आरोग्य विभागासाठी हवामानातील बदलाच्या शिवधनुष्याचे मोठे आव्हान आहे. समाज, शासनाने एकत्र त्याचा सामना करण्याची गरज आहे.

त्याचं नाव थोडंसं अवघड आहे, गिआनलुका ग्रिमाल्डा (Gianluca Grimalda)! पण त्याच्या नावापेक्षा त्याच्यासारखे वागणे अधिक कठीण आहे. पपुआ न्यू गिनी बेटावर तो काम करत होता आणि एकदम त्याला त्याच्या संस्थेने पुढील सोमवारी किल या जर्मन शहरात बोलावून घेतले. तो म्हणाला, ‘इतक्या लवकर येणे मला शक्यच नाही.’ ‘विमानाने ये ना,’ संस्थेचे साधे उत्तर. ‘त्यापेक्षा मी सावकाश प्रवास करत बोटीने अन् रेल्वेने येईन. विमानाने येऊन साडेचार टन अधिकचा कार्बन हवेत सोडणे मला अनैतिक वाटते.’ त्याची संस्था त्याला कामावरून काढण्याची धमकी देते पण तो बधत नाही. नोकरी जाते. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम. पण अशी वेडी माणसं मोजण्यासाठी एका हाताची बोटेही जास्त होतात अन् मग हवेत आपल्या मूर्खपणाचा ‘कार्बन’ साचत जातो, वातावरण काळवंडत जाते, वसुंधरेचा ताप वाढत जातो. आपण फक्त हवामानबदलाबाबत काही करायला हवे म्हणत शब्दांचे बुडबुडे उडवित राहतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com