
प्रतिनिधी
लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या विपुल साहित्यकृतींमधील ऐंशीहून अधिक कवितांसह, कथा, ललित लेख, कादंबरी, समीक्षा आणि मानवत येथे झालेल्या २१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा शब्दऋतूत समावेश आहे. या सर्व दर्जेदार निवडीमधील सर्वोत्तम निवड आहे ती तांबोळींच्या दूर गेलेले घर या कादंबरीची. सत्तरच्या दशकात राज्यपुरस्कार प्राप्त ठरलेली ही लघुकादंबरी म्हणजे स्थलांतर, परावलंबित्व, श्रद्धास्थानांच्या दुरावलेपणा याविषयांना स्पर्श करणारी एक अभिजात कादंबरी आहे. सर्वकाली कासावीस करणारा हा विषय असल्याने तो पुन्हा वाचकांच्या नजरेसमोर आणून संपादकांनी औचित्य साधले आहे.