Premium| Financial Literacy for Students: आर्थिक साक्षरता नसल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचे निर्णय घेतात. या गोष्टी माहीत असतील तर तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही आणि मानसिक त्रासातूनही मुक्त व्हाल!

Student budgeting: कॉलेज जीवनात विद्यार्थी पहिल्यांदाच स्वतःचा खर्च नियोजित करतात. शहाणपणाची कमतरता आणि आकर्षक ऑफर्समुळे ते कर्जाच्या सापळ्यात अडकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता असायला हवी
Financial Literacy for Students

Financial Literacy for Students

esakal

Updated on

मुंबई: शालेय जीवन संपल्यानंतर विद्यार्थी अचानक मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांसमोर उभे राहतात. शिक्षणाची फी, वसतिगृहाचे खर्च, जेवणाचा खर्च, पुस्तकं आणि रोजचे किरकोळ व्यवहार या सगळ्या गोष्टी हाताळताना पैशांचं योग्य नियोजन करण्याचं कौशल्य किती महत्त्वाचं आहे हे त्यांना हळूहळू उमगू लागतं. पण दुर्दैवाने, बहुतांश विद्यार्थ्यांना या वयात आर्थिक शहाणपणाचं शिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळे अनेक विद्यार्थी विविध सापळ्यांमध्ये अडकतात. त्याचबरोबर आर्थिक नियोजनाअभावी या मुलांना मोठ्या प्रमाणावर मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं.

अमेरिकेत टीआयएए (TIAA) या संस्थेने २०२५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. १८ ते २६ वर्षांच्या जनरेशन Z विद्यार्थ्यांनी वित्तीय साक्षरतेसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना केवळ ३८ टक्के बरोबर उत्तरे दिली, तर इतर प्रौढांची सरासरी ४९ टक्के होती. म्हणजेच, एका प्रगत देशातील तरुण पिढी इतकी मागे असेल तर आपल्या देशातील परिस्थिती काय असेल याची सहज कल्पना करता येते. भारतातील शिक्षणपद्धतीत १२ वी पर्यंतही वैयक्तिक आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही, त्यामुळे कॉलेज वयात प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांना पैशांचा नियोजनपूर्वक वापर करण्याची अडचण जाणवते.

याशिवाय घरातील वातावरण, परंपरागत चुकीच्या आर्थिक सवयी, सोशल मीडियावरील दिशाभूल करणारी माहिती यामुळेही विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढतो. आवश्यक खर्चांसोबतच आकर्षक ऑफर्स, बीएनपीएल (BNPL) योजना, क्रेडिट कार्ड यांचं आकर्षण विद्यार्थ्यांना कर्जाच्या सापळ्यात ओढतं. एकीकडे बचतीचं भान राहत नाही, तर दुसरीकडे भविष्यातील आर्थिक ताणाचं ओझं वाढतं. या सर्व गोष्टींवर मात करणं शक्य आहे. सकाळ प्लसच्या या लेखात तुम्हाला समजेल की, कॉलेज वयात आर्थिक नियोजन का कठीण ठरतं? विद्यार्थी कर्जाच्या जाळ्यात कसे अडकतात आणि या सगळ्यांवर मात करून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन कसं शिकवायचं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com