Premium| AI Writing Controversy: कॉमनवेल्थ साहित्य पुरस्कारात एआयचा वाद, कथा माणसाने लिहिली की एआयने?

Human vs AI : कथा एआयने लिहिली की माणसाने, हे ठरवण्यासाठी केवळ एआय डिटेक्टरवर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे? कॉमनवेल्थ साहित्य पुरस्कारातील वादातून एआय तपासणीची मर्यादा, लेखकांची स्वतंत्र लेखनशैली आणि स्पर्धांमधील पारदर्शक नियमांची गरज अधोरेखित झाली आहे
Literary Award Debate

Literary Award Debate

esakal

Updated on: 

साहित्य म्हणजे माणसाच्या भावना, अनुभव आणि विचार शब्दांतून मांडण्याची कला. पण एखादी कथा माणसाने लिहिली आहे की एआयने, हे कसे ओळखायचे? हाच प्रश्न २०२६ च्या कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राईझमुळे चर्चेत आला. या स्पर्धेत जिंकलेल्या लेखकांवर एआय वापरल्याचे आरोप झाले. मात्र, तपासणी करणाऱ्या साधनांनीच वेगवेगळे निष्कर्ष दिले. मग खरे काय, हे ठरवायचे कसे? जमीर नझीर यांनी हे आरोप फेटाळले. शारीरिक अडचणींमुळे ते मोबाईलवर बोलून कथा लिहित होते. फाउंडेशनच्या चौकशीनंतर विजेत्यांना दिलासा मिळाला. पण या वादाचा परिणाम इथेच थांबला नाही. ‘ग्रँटा’ या प्रसिद्ध मासिकाने कॉमनवेल्थ फाउंडेशनसोबतची प्रकाशन भागीदारी संपवली. या घटनेमुळे साहित्यविश्वापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. एआयने लिहिलेला मजकूर ओळखणारी साधने किती विश्वासार्ह आहेत? वेगळ्या शैलीत लिहिणाऱ्या लेखकांवर विनाकारण संशय घेतला जाऊ शकतो का? आणि साहित्याचे खरे महत्त्व कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com