
सुधीर बदामी
शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास हा नेहमीच सुखकर तर हवा; पण सुरक्षित मात्र नक्कीच हवा. मात्र, मुंबई किंवा अन्य महानगरांतील प्रवास त्या दृष्टीने म्हणावा तेवढा सुखकर नाहीच; परंतु सुरक्षितसुद्धा नाही.
याचा प्रत्यय या अपघातांच्या संख्येकडे पहिले की येतो. कोणत्याही मोठ्या शहरातील गर्दी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पाहता वृद्ध, गरोदर महिला, अशक्त किंवा चक्क १० वर्षांच्या मुलासाठीही ही परिस्थिती अजिबात सुरक्षित नाही.