
Vehicle Headlight Technology
esakal
अरविंद रेणापूरकर
arvind.renapurkar@esakal.com
वाहनांचा प्रकाशझोत स्वच्छ, पांढरा आणि प्रखर असल्यास चालकही कोणत्याही स्थितीत निर्धास्तपणे प्रवास करतो. सुमारे दोन-तीन शतकांपूर्वी रात्रीच्या वेळी प्रवासात घोडेस्वार हातात मशाल घेऊन इच्छीतस्थळी जात असे. पालखी घेऊन जातानाही सेवकांच्या हाती मशाल असायची.
यामागे दोन उद्देश असायचे, एकतर मार्ग दिसणे आणि दुसरे म्हणजे जंगली जनावरांपासून संरक्षण मिळवणे. कारण रात्रीच्या वेळी प्रवास जोखमीचा असायचा; पण कालांतराने पारंपरिक प्रवासाच्या साधनांची जागा चारचाकी वाहनांनी घेतली. आता तर रात्रीच्या प्रवासाची भीती नाहीशी झाली असून, यात वाहनांचे आधुनिक हेडलाइट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वाहनांचे दिवे हे एक आवश्यक फीचर असून, त्याचा कालबद्धरीतीने विकास झाला आहे.