
डॉ. श्रीकांत परांजपे
दीर्घकाळ स्वायत्ततेसाठी आणि मग स्वातंत्र्यासाठी लढणारा बलुचिस्तान पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार सहन करत आला आणि आता चीनच्या दबावाला सामोरा जात आहे. ‘बलुचिस्तान’चा लढा म्हणजे ‘दहशतवादी कारवाया’ नसून ‘स्वातंत्र्यलढा’ आहे, हे नॅरेटिव्ह यशस्वीपणे मांडले गेले तरच लढ्याला यश मिळेल.