
डॉ. विनया जंगले
संपूर्ण जगभरात केवळ ६७४ आशियाई सिंह उरलेले असताना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जानेवारी महिन्यात आणखी एका सिंहाची भर पडली होती! चौदा वर्षांनंतर महाराष्ट्रात आशियाई सिंह जन्माला आला होता! भारतात सध्या आशियाई सिंहापासून ते माळढोक पक्ष्यापर्यंत अनेक वन्यजीवांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत, त्याविषयी...
रीख होती १६ जानेवारी २०२५. मी आदल्या दिवशीपासूनच राहून राहून हातातल्या मोबाईलकडे बघत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणिसंग्रहालयातल्या पिंजऱ्यांचे सीसीटीव्ही माझ्या मोबाईलला जोडलेले होते. त्यामुळे पिंजऱ्यातील प्राणी काय करत आहेत, हे मला मोबाईलवर दिसायचं. पण त्यादिवशी मला इतर प्राण्यांमध्ये रस नव्हता. मी एकच स्क्रीन पुन्हा पुन्हा उघडत होते, तो म्हणजे आमच्या ‘मानसी’ सिंहिणीच्या बाळंतपणाच्या खोलीतलं दृश्य दाखवणारा स्क्रीन.