
कृष्ण जोशी
joshikri@gmail.com
‘संविधान सर्वांसाठी’ पुस्तकाची शैली शैक्षणिक असूनही कोरडी नाही. ती वाचकाला विचार करायला लावते, संविधानाचे महत्त्व समजावते आणि त्याच्या रचनेतील गाभा उलगडते. त्यामुळे ते भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची सुलभ भाषा असलेले विवेचन आहे.
‘संविधान सर्वांसाठी’ हे पुस्तक भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे सामान्य वाचकांना समजावून सांगण्यासाठी लिहिले गेलेले आहे. आपले संविधान जगातील सर्वात विस्तृत आणि तपशीलवार म्हणून ओळखले जाते. मात्र त्यातील अनेक तांत्रिक बाबी सामान्य माणसाला गुंतागुंतीच्या आणि दुर्बोध वाटतात. अशा परिस्थितीत हे पुस्तक सामान्य नागरिकांसाठी एक प्रभावी, सोप्या भाषेतील मार्गदर्शक म्हणून कार्य करते.