
Cotton Import India
esakal
अमेरिकेसारख्या देशात शेतमाल किमतींमध्ये होणाऱ्या घसरणीपासून बचाव करणाऱ्या विविध ‘शेतमाल किंमत विमा योजना’ कार्यान्वित असल्याने तेथील शेतकऱ्यांना किंमत घसरणीचा फटका बसत नाही. भारतातही अशा प्रकारच्या शेतमाल किंमत विमायोजनेची अंमलबजावणी व्हायला हवी.
‘ट्रम्प टॅरिफ’चा फटका कमी करण्यासाठी भारताने कापसासारख्या कृषी उत्पादनावरील आयातशुल्कात १९ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ११ टक्के एवढी सूट देत अमेरिकेसोबत अजूनही रास्त व्यापार तडजोडी होऊ शकतात, हे भारताने दर्शवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतामध्ये कापसाची आयात वाढणार असून, त्याचा देशातील कापूस मूल्यसाखळी आणि कापड उद्योगाला लाभ होणार असला तरी, कापसाचे बाजारभाव कमी होऊन कापूसउत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, असेच दिसत आहे.