
Vice President Election 2025
esakal
१. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.
सी.पी.राधाकृष्णन यांचा परिचय :
जन्म : २० ऑक्टोबर १९५७, तिरुपुर, तमिळनाडू.
वयाच्या १६-१७ व्या वर्षीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनसंघ यांच्याशी जोडले गेले.
२००३ ते २००६ या काळात ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.
१२ व्या लोकसभा निवडणुकीत (१९९८-९९) कोईम्बतूर (तमिळनाडू) मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत गेले. पुन्हा याच मतदारसंघातून १३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी (१९९९-२००४) ते निवडून आले.