

Critical Care Insurance
sakal
बदलत्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारास सामोरे जावे लागते व त्या अनुषंगाने खर्चही होत असतो. पण आरोग्य विम्यामुळे आर्थिक भरपाई सुलभ होत असल्याने आता बहुतेक जण आरोग्य विमा घेत आहेत. मात्र, आजारपणामुळे व्यावसायिक किंवा नोकरीतील पगाराचे नुकसान झाल्यास, त्याची भरपाई मिळत नाही. यासाठी क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे गरजेचे असते.
सर्व साधारणपणे मेडिक्लेम पॉलिसीमुळे पॉलिसीधारकास आजारपणामुळे रुग्णालयातील प्रत्यक्ष खर्च किंवा जेवढे पॉलिसी कव्हर आहे, या दोन्हीतील कमी असणाऱ्या रकमेइतकी भरपाई (रीएम्बर्समेंट) मिळते. मात्र, आजारपणामुळे झालेले व्यावसायिक नुकसान किंवा पगाराचे नुकसान याची भरपाई मिळत नाही. बऱ्याचदा ही रक्कम मोठी असते, यामुळे रुग्ण बरा झाला, तरी आर्थिक अडचणीत येऊ शकतो. यावर उपाय म्हणजे आवश्यक त्या कव्हरची क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे. नेमकी ही पॉलिसी कशी असते, तिचे फायदे-तोटे काय याची माहिती जाणून घेऊ या.