
crypto currency market
esakal
अतुल कहाते
saptrang@esakal.com
शेअरबाजार व आभासी चलनाबाबत विचार करताना एक लक्षात घेतलं पाहिजे, उद्याविषयीची अनिश्चितता हे बाजारांसाठीचं मोठं संकट असतं. डोनाल्ड ट्रम्प यांनाच विलक्षण आवडत असलेल्या आभासी चलनांच्या बाजारात सुद्धा याचं वादळ शिरताना दिसतं आहे. या सगळ्याचा डॉलरशी निकटचा संबंध आहे. पण अल्पकालीन मुदतीमध्ये नेमकं काय घडू शकेल हे सांगणं एकूणच खूप कठीण असताना ट्रम्पकाळामध्ये तर ते अशक्यच झालेलं आहे.
काही वर्षांपूर्वी एका बिटकॉइनची किंमत एक कोटी रुपयांहून जास्त होईल, असं भाकीत कुणी केलं असतं तर कदाचित आपण त्या माणसाला वेड्यात काढलं असतं. आता ही किंमत एक कोटी रुपयांपेक्षा कमी कशी झाली, असं म्हणून लोक त्याविषयी आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. खरं म्हणजे कसलाही आगापीछा नसताना विलक्षण वेगानं वर-खाली होत असलेल्या आभासी चलनांच्या (क्रिप्टो करन्सी) दुनियेविषयी कसलीच भाकितं करणं जवळपास अशक्यप्राय आहे.