
गोपाल जोगे
भारतीय उपखंडातील पुरातत्त्वीय उत्खननांमधून सापडलेले प्राचीन दागिने, शैलचित्रांतील अलंकरण, तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक घटक या साऱ्यांमधून अलंकारांचा प्राचीन इतिहास उलगडतो. या अलंकारांतून केवळ कलात्मकतेचेच नव्हे, तर त्या काळातील सामाजिक, आर्थिक, आणि धार्मिक जीवनाचेही दर्शन होते.