
जगातील वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी चलने असतात. त्या चलनाचे त्याचे असे एक देशांतर्गत मूल्य असते. हे मूल्य त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तत्कालिक आणि तौलनिक समृद्धीवर अवलंबून असते. एका देशाच्या चलनाच्या तुलनेत दुसऱ्या देशाच्या चलनाच्या विनिमयाचा दर याला चलनमूल्य असे म्हटले जाते. चलनमूल्य ही मुळात आर्थिक घटना असते. मात्र, त्याला सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीही निश्चितच असते. त्यामुळे राजकारणातही चलन महत्त्वाची भूमिका बजावते. चलनाचे राजकारण म्हणजे नेमके काय, यावर टाकलेला हा प्रकाशझोत...