
यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी' माहीत असणं खूप महत्वचं असतं. नुसती पुस्तके वाचून चालत नाही, तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय, देशात आणि जगात काय चाललंय याची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. आता एवढ्या प्रमाणात चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा, त्यांच्या नोट्स कशा काढायच्या आणि त्यांची उजळणी कशी करायची हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. चला, आज आपण हे सोप्या पद्धतीने समजून घेऊयात.