राहुल पवार | यशवंत पाठक
सतीश गायकवाड
saptrang@esakal.com
चीनमध्ये विशिष्ट प्रकारची उत्पादने एकाच शहरात उत्पादित केली जातात, त्यामुळे तुम्हाला एखादे मशिन घ्यायचे असल्यास देशभरातील अनेक शहरे फिरावी लागत नाही. आपल्या कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे स्वच्छता तेथील उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये राखली जाते. ग्राहक वस्तू घेण्यासाठी आल्यास त्याचे योग्य आदरातिथ्य केले जाते.
ग्राहकांना संवादामध्ये कोणती अडचण येणार नाही याची व त्याच्या येण्या-जाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची होईल, अशी खबरदारी तेथील उद्योजक घेतात, असे अनेक अनुभव आम्ही चीनमध्ये काही उत्पादने खरेदी करण्यासाठी गेलो असता घेतले. चीनच्या प्रगतीमागे असलेली कार्यपद्धती व भारताने काय करायला हवे याविषयी..