शिरीष देशपांडेसायबर गुन्हेगारीचा विळखा अधिकाधिक लोकांना वेढून टाकू लागला असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन वेळीच उपाययोजना करायला हव्यात. तपासयंत्रणा, सरकार यांची या बाबतीत जबाबदारी आहेच; परंतु नागरिकांच्या जागरुकतेची आणि प्रयत्नांचीही आवश्यकता आहे..केंद्रीय गृहखात्याने नुकतीच सायबर गुन्ह्यातील फसवणुकीसंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यात अकरा हजार कोटींहून अधिक रक्कमेचे नुकसान झाले आहे. फसवणुकीच्या घटनांत स्टॉक मार्केटशी संबंधित फसवणुकीच्या घटना जास्त असल्याचे आढळले.या सायबर गुन्हेगारीचा विळखा अधिकाधिक लोकांना वेढून टाकू लागला असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन वेळीच उपाययोजना करायला हव्यात. सायबर गुन्हेगारांच्या ‘मोडस ऑपरेंडी’विषयी आधी जाणून घेऊया. सायबर चोरांना तुमची कोणत्या तरी स्वरूपात माहिती मिळते. त्याआधारे ते आपल्याशी संपर्क साधतात. बऱ्याचदा तुमच्या आवडीनिवडी, भावना, कल यांविषयी त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्याआधारे ते तुम्हाला कशात तरी गुंतवण्याचा प्रयत्न करून तुम्हाला एखादी चूक करायला भाग पाडतात. उदाहरणार्थ, एखादा गुन्हेगार तुम्हाला फोन करतो आणि सांगतो की तुमचं ‘केवायसी’ ( नो युवर इन्फर्मेशन) अद्ययावत करणे निकडीचे आहे, अन्यथा तुमचे खाते गोठू शकते. तुम्हाला यासंबंधीची बँकेची प्रक्रिया माहीत नसते. मग तो गुन्हेगार तुमच्या मनात त्याच्या सचोटीची खात्री निर्माण करतो. विश्वास संपादन केला की मग तो त्याच्या कृष्णकृत्याला सुरुवात करतो. तो तुम्हाला एखादी लिंक डाऊनलोड करायला सांगतो किंवा तिच्यावर क्लिक करायला सांगतो. ही लिंक वस्तुतः बेकायदा असते. पण तिच्याद्वारे तो तुमच्या खात्यापर्यंत पोचतो आणि तुमचे सर्व पैसे हडप करतो!.Cyber Crime : डिजिटल अॅरेस्टबाबत व्हा सावधान! सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे प्रकार सजगतेने टाळा.या सायबर चोरांच्या टोळ्या असतात आणि ही गुन्हेगारी एखाद्या व्यवसायासारखी चालवली जात असते. तंत्रज्ञांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. तंत्रज्ञानाची साधने आणि सर्वसामान्य माणसाला फसवण्याच्या क्लृप्त्या वापरायला त्यांना शिकवले जाते. गुन्हेगारीची सुरुवात ही अशी अजाण लोकांचे मन वळवणे आणि त्यांच्या भावनांशी खेळणे ह्यातून होते. झटपट पैसा मिळवण्याच्या मागे लागलेले लोक तर त्यांच्याकडे सहज आकृष्ट होतात. शेअरच्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य माणसाला त्यात ओढले जाते. हे गुन्हेगार आपल्याला धमकी देतात. घाबरवून सोडतात. खोट्या पोलिसांच्या वेशात तुम्ही अमुकअमुक गुन्ह्यामध्ये अडकला आहात, असे खोटे भासवू शकतात आणि एकदा तुम्ही घाबरला आहात असे कळाले की, तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याच्या आमिषाने फसवतात. यातील बरेचसे गुन्हे परदेशातून होत आहेत.डिजिटल बँकिंग आणि इंटरनेटआधारित तंत्रज्ञान यांनी आपल्या कार्यपद्धतीत सोपेपणा आणला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एनपीसीआय (National Payments Corporation of India) मुळे ‘यूपीआय’द्वारे रोखीचे व्यवहार अतिशय सुलभ झाले. ऑनलाइन वस्तू घेण्याचे प्रमाण वाढले. सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. हीच संधी साधून सायबर चोरट्यांनीही आपला लुबाडण्याचा व्यवसाय वाढवला आहे..एकीकडे सुविधा, दुसरीकडे त्रेधासमाजमाध्यमांचा वापर आणि व्हॉट्स ॲपसारखे व्यासपीठ ह्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत सगळ्या स्तरांमधील जनतेला एका समसमान पातळीवर आणून ठेवले. यातून आयुष्य एकीकडे सुकर झाले हे खरेच; पण दुसरीकडे योग्य ती खबरदारी न घेतल्यास सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले. सर्व टेलिफोन कॅाल, वेबसाईट लिंक्स, एसएमएस हे बनावट असल्याची शक्यता लक्षात घेऊनच हाताळणे गरजेचे आहे. कोणताही व्यक्तिगत तपशील अनोळखी लोकांना कधीही देऊ नका.‘ओटीपी’ मागितला तर अजिबात देऊ नका. काहीही मोफत मिळत नसते. तसा दावा करणारी व्यक्ती फसवण्याच्याच उद्देशाने हे करीत असणार, असे मानून सावधगिरी बाळगायला हवी. अधिक पैशाची हाव ही बऱ्याच गुन्ह्यांसाठी निमित्त होत आहे. कष्टाला पर्याय नाही, हे प्रत्येकाने मनाशी पक्के जाणून असावे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही माहिती असलेल्या समोर दिसणाऱ्या व्यक्तीबरोबर शहानिशा करूनच करावी. कोणत्याही सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर जाहिरात ही खोटी असू शकते. मोबाईल वेळोवेळी तपासून ‘ॲप’ची पडताळणी करावी. चुकून कोणते अँप डाउनलोड झाले नाही ना तपासा. मोबाईलमधील ‘नेट बँकिंग’ सायबर गुन्ह्यासाठी कारणीभूत होऊ शकते .सोशल नेटवर्कच्या आधारे मैत्री करण्याच्या नादाला लागू नका. आपण ज्यांना व्यक्तिगत स्वरूपात ओळखतो, अशाच लोकांशी ओळख वाढवा. समाजमाध्यमांच्या खात्यांची सुरक्षितता वाढवावी. व्हॉटसॲप ‘पिन’ (PIN) सेट करा. ‘फेसबुक’मध्ये आपले प्रोफाइल लॉक करा. भारतात कोणताही खटला ऑनलाईन भरला जात नाही. वैयक्तिक नोटीसच पाठवली जाते आणि कायद्याची पूर्तता करणेसाठी वेळही मिळतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा/वकिलाचा/पोलिसांचा नेहमी सल्ला घ्या ..समाजाची जबाबदारीएकीकडे समाजात विषमता वाढत आहे तर दुसरीकडे चंगळवाद वाढतोय. अनावश्यक गरजा आपण वाढवत चाललो आहे आणि त्यातून आभासी जगाच्या मायाजालात खेचले जात आहोत. सारासार विचार करणे, सामान्यज्ञान ( कॉमनसेन्स) वापरणे आणि आपल्यापर्यंत आलेली गुन्ह्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे सर्वांचे कर्तव्य असावे. समाजमाध्यमांचा वापर तारतम्यानेच केला पाहिजे. समाजमाध्यमांबरोबर वैयक्तिक भेटीगाठी वाढवणे गरजेचे आहे. आपल्या बाबतीत कोणतीही फसवणूक घडली तर आपण १९३० या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, तसेच ताबडतोब संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. सरकार अधिकाधिक सक्षम अशी ‘सायबर सेल’ची उभारणी सर्व राज्यांत करत आहे; जेणेकरून तपासयंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकतील. सरकारने तातडीने चार हजार ‘सायबर योद्धे’ (कमांडो) तैनात करण्याचे योजले आहे.जेणेकरून तातडीची मदत उपलब्ध होईल. सरकारने ‘सायबर सेल’ला जोडून ‘भरोसा सेल’ तयार केला आहे. जेणेकरून लैंगिक छळ होत असेल तर मार्गदर्शन आणि मानसोपचार मिळू शकतील..पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावरील सर्व तपासयंत्रणांना कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हे प्रतिबंध करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. परंतु अद्यापही काही गोष्टी करण्याची गरज आहे.तक्रार करण्याचे पोर्टल आणि १९३० नंबरची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे एकावेळेस अनेक तक्रारी दाखल करणे शक्य होईल.संगणक/टेलिफोन यंत्रणा अद्ययावत करणे, ऑनलाइन तक्रारींची स्थानिक चौकीद्वारे तातडीने दखल घेतली जाणे, सर्व प्रसारमाध्यमांतून ‘सायबरसाक्षरता’ वाढवण्याचा प्रयत्न करणे, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांना खास प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवणे, त्यांच्यात जागृती घडवणे गरजेचे आहे. सरकारने या बाबतीतील खटले त्वरित निकाली निघण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी.सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत प्रतिसाद प्रामुख्याने प्रतिक्रियात्मक असतो. परंतु सकारात्मक सक्रिय व्यवस्थाही वाढवावी. तज्ज्ञांच्या मदतीने गुन्ह्यांच्या प्रतिबंधाला पूरक अशी आधुनिक संगणकप्रणाली तयार करून घेऊन ती राबवावी. अशा तऱ्हेच्या गुन्ह्यांच्या स्वरूपाबाबत जास्तीत जास्त लोकांचे प्रबोधन करावे.(लेखक चार्टर्ड अकाउंटंट व सायबर सुरक्षा या विषयाचे अभ्यासक आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.