

Cyber Fraud in Fixed Deposit
esakal
मुकुंद बी. अभ्यंकर - mbabhyankar@gmail.com
सा यबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. केवळ ओटीपी शेअर केल्यानंतर बँकेतील संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांनी काढून घेतल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.
अनेक ज्येष्ठ नागरिकांचा कल बँकेत मुदतठेव (एफडी) करण्याकडे असतो. अशा वेळी, बँक खाते नेटबँकिंगशी जोडलेले असेल, तर ‘एफडी’देखील त्या कक्षेत येते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून ‘एफडी’मधील रक्कम लांबवली जाईल का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण होते. या शंकेचे काही प्रमाणात निरसन करण्याचा प्रयत्न.
टबँकिंगच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात मुदत ठेव (एफडी) ठेवल्यास ती पूर्णपणे ऑनलाइन व्यवस्थापित करता येते. मुदत पूर्ण झाल्यावर किंवा त्याआधीही ती मोडून रक्कम सहजपणे आपल्या बचत खात्यात जमा करता येते. यासाठी बँकेत जाण्याची गरज नसते. मात्र, याच कारणामुळे डिजिटल ‘एफडी’ सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकते. सायबर गुन्हेगारांना तुमच्या नेटबँकिंगचा प्रवेश मिळाला, तर ते बचत खात्यासोबतच ‘एफडी’मधील रक्कमही काढू शकतात. त्यामुळे काहीजण डिजिटल ‘एफडी’ऐवजी बँकेत प्रत्यक्ष जाऊन कागदी पावतीसह ‘एफडी’ करण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय कितपत सुरक्षित आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.